Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे जिल्ह्यात खळबळ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मा.नगरसेवकाची कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

जेजुरी – जमिनीच्या वादातून जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहबूब पानसरे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. पानसरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु केला. 

याबाबत माहिती अशी की, मेहबूब पानसरेंचा काही लोकांशी जमिनीचा वाद सुरू होता. या कारणावरुन पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. ज्यामध्ये पानसरे गंभीर जखमी  झाले. त्यांना जेजुरीतून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे खासदार सुप्रिया सुळे  यांचे निकटवर्तीय मानले जातात.

पानसरे हे जेजुरी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते.तसेच ते व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध होते. पानसरे यांच्या हत्येमध्ये पाच ते सहा आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात  रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करीत आहेत. 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!