Just another WordPress site

ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी दिला चोप

त्या हल्लेखोरांची पोलीसांनी काढली धिंड,नाशिकचा व्हिडिओ व्हायरल

नाशिक दि १(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये काही दिवसापुर्वी भर दिवसा धारदार हत्याराने वडापाव विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती.पण हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी त्यांना त्याच ठिकाणी चांगलाच चोप दिला आहे. पोलीसांनी दिलेल्या शिक्षेची चांगलीच चर्चा होत आहे.

नाशिकमध्ये विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला होता. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. हल्लेखोर संशयितांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी कोयत्याने हल्ला केला होता, त्याच ठिकाणी चोप देत टवाळखोरांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिसांनी या संशयित हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

GIF Advt

नाशिकमध्ये जुन्या वादातून वडापाव विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी गाड्यावर असलेले सामान रस्त्यावर फेकत आणि कोयते नाचवत दहशत निर्माण केली होती. हल्लेखोरांनी त्याठिकाणी उपस्थित अजून एका व्यक्तीवरही हल्ला केला आणि गाडीवर बसून त्या ठिकाणहून पळ काढला होता. पण आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!