Just another WordPress site

ड्रायव्हर नसतानाही गोल गोल फिरू लागली रिक्षा

सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल, कोकणात नेमक काय चालूय..

रत्नागिरी दि १(प्रतिनिधी)- रत्नागिरी शहरातील जेलनाका येथे झालेल्या अपघातामध्ये रिक्षाचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ती गोलगोल फिरू लागली. चालक बाहेर फेकला गेल्याने रिक्षावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले होते. रिक्षा थांबवण्यासाठी जमलेल्या काही तरुणांनी प्रयत्न केले; मात्र नियंत्रण ठेवणे शक्य होते नव्हते. दहा मिनिटे हा थरार सुरू होता. अखेर तिथे जमा झालेल्या तरुणांनी एकत्र बळाचा वापर करत आडवे जात रिक्षा थांबवली. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला पण याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रत्नागिरीतील हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर झालत अस की, रत्नागिरी जेल नाका येथे एक रिक्षाचा अपघात झाला. अपघातादरम्यान रिक्षा चालक बाहेर फेकला गेला. मात्र त्यादरम्यान रिक्षाचे हॅंडल लॉक झाले आणि रिक्षा जागच्या जागी गोल फिरू लागला. तेथील स्थानिकांनी रिक्षा थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण रिक्षा काही केल्या थांबेना. अखेर रिक्षा अडवून धरण्यात आली. आणि मग रिक्षाचे हॅंडल अनलॉक करण्यात आले. या अपघातामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.वेगाने फिरणाऱ्या रिक्षाचा एका बाजूला तोल गेला असता तर संपूर्ण नुकसान झाले असते. चालकाशिवाय फिरणारी रिक्षा पाहिल्यानंतर अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. अनेकांनी या फिरणाऱ्या रिक्षाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती.

GIF Advt

काही रिक्षावाले खतरनाक रायडर असतात. ही मंडळी वेगवेगळे स्टंट करत असतात. पण स्टंट मारणाऱ्या रिक्षाचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. पण सध्या मनोरंजन होत असल्याने व्हिडीओ सोशल मिडीयावर धूमाकूळ घालत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!