अहमदनगर – रेखा जरे हत्याकांड प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे ही मागणी केली आहे. बोठेचा मोबाईल अनलॉक होत नसल्याने या हत्याकांडाचा तपास अजून अपूर्ण आहे. तपास पूर्ण होण्यासाठी बाळ बोठेच्या आयफोनचा लॉक उघडणे अत्यावश्यक आहे. हा लॉक उघडल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर येतील असा दावा ॲडव्होकेट सुरेश लगड यांच्याकडून करण्यात आला आहे. 2020 साली रेखा जरे हत्याकांड घडले होते.