Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! लवकरच गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप बंद होणार? इराणच्या धमकीने इंटरनेटवर संकट

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता जगाला हादरवून टाकणारा इशारा दिला आहे. इराणशी संबंधित मीडिया आणि सुरक्षा यंत्रणांनी थेट समुद्राखालील इंटरनेट केबल्सना लक्ष्य करण्याचे संकेत दिले असून, यामुळे हिंदुस्थानसह संपूर्ण जगाचे इंटरनेट ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सशी (IRGC) संबंधित माध्यमांनी पर्शियन गल्फ आणि होर्मुजच्या खाडीखाली असलेल्या केबल नेटवर्कला कापण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

आत्तापर्यंतचे युद्ध हे केवळ तेल पुरवठा आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित होते. मात्र आता हे डेटा वॉरमध्ये रूपांतरित होताना दिसत आहे. होर्मुजची खाडी हा जागतिक इंटरनेटचा मुख्य कणा मानला जातो. येथून अनेक आंतरराष्ट्रीय फायबर ऑप्टिक केबल्स जातात. ज्या आशिया, युरोप आणि मिडल इस्टला जोडतात. जगातील ९५ टक्क्यांहून अधिक इंटरनेट डेटा याच समुद्राखालून जाणाऱ्या केबल्सद्वारे प्रवाहित होतो. जर इराणने या केबल्सना हानी पोहोचवली, तर बँकिंग, क्लाउड सर्व्हिसेस, ऑनलाइन पेमेंट आणि एकूणच डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते.या संभाव्य संकटामुळे हिंदुस्थानचीही चिंता वाढली आहे. हिंदुस्थानचे सुमारे ६० टक्के इंटरनेट ट्रॅफिक हा मिडल इस्ट आणि युरोपमार्गे जाणाऱ्या याच केबल्सवर अवलंबून आहे. या केबल्सना धक्का लागल्यास हिंदुस्थानातील इंटरनेटचा वेग मंदावेलच, पण आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीवरही मोठा परिणाम होईल. जरी हिंदुस्थानकडे सिंगापूरमार्गे जाणारा दुसरा मार्ग उपलब्ध असला, तरी तो संपूर्ण डेटा लोड पेलण्यासाठी पुरेसा नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडरसी केबल्सना लक्ष्य करणे हा इराणचा एक धोरणात्मक इशारा असू शकतो. जरी अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे स्वतः इराणच्या इंटरनेटवरही परिणाम होणार असला, तरी युद्धाची तीव्रता वाढल्यास डिजिटल पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हा इराणचा शेवटचा आणि सर्वात घातक पर्याय असू शकतो. जर खरोखरच या केबल्स तोडल्या गेल्या, तर त्या दुरुस्त करण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ज्यामुळे जगभरात मोठे संकट निर्माण होऊ शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!