Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलांची शक्यता! रिक्त पदांवर वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच; सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दणदणीत मतांनी विजय मिळवला. यानंतर आता बारामतीत ‘सुनेत्रापर्वाचा’ प्रारंभ झाला आहे.सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार असणार बनल्या आहेत. त्यांच्या अगोदर ममता शिरोळे या साठच्या दशकात बारामतीच्या पहिल्या महिला आमदार राहिल्या होत्या.पोटनिवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी (ता.०६) सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याविषयी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे पक्षातील अनेक महत्वाची पद रिक्त असून, या पदांवरील नियुक्ता जाहीर केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्तीसाठी अनेकजण इच्छूक असून, पद मिळण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोणती पद रिक्त?
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष हे पद रिक्त आहे. या पदावरून सूरज चव्हाण यांना बाजूला केल्यापासून जवळपास 10 महिन्यांपासून हे अध्यक्षपद रिक्त आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अत्यंत महत्वाचे पद म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष पदाकडे पाहिले जाते, हेही पद रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यापासून रिक्त आहे. या पदासाठी अनेक महिला नेत्यांच्या नावाची चर्चा असून, संधी कोणाला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.तसेच पक्षातील अन्य पदांवर देखील नियुक्ता रखडलेल्या आहेत. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने लवकरच या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे.

अर्थखातेचे काय झालं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेले अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्यापर्यंत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे कधी येणार आणि त्याचा कार्यभार स्वतः सुनेत्रा पवार सांभाळणार की राष्ट्रवादीतील एखाद्या मंत्र्यांवर अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!