Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मिशन कन्व्हर्जन’ची निदा खान मास्टरमाईंड ?

TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याबाबत तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, तिच्यावर ‘मिशन कन्व्हर्जन’ची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

काय आहे ‘मिशन कन्व्हर्जन’चं टार्गेट?
एसआयटी (SIT) कडून सुरू असलेल्या तपासात निदा खानचा सहभाग केवळ कटापुरता मर्यादित नसल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या पुराव्यांनुसार, निदा खानला विशिष्ट ‘टार्गेट’ देण्यात आले होते. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा कट तिने रचला होता. आयटी क्षेत्रातील सुशिक्षित तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट यामागे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

निदा खानचा पाय खोलात; जामीन अर्ज फेटाळला
मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतून सुटका करून घेण्यासाठी निदा खानने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने आणि तपासात सबळ पुरावे मिळाल्याने न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे. सध्या निदा खान फरार असून तिच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!