ब्रेकिंग! अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार
शपथविधीची तारीखही ठरली, एकनाथ शिंदे गटाचा गेम होणार, बघा काय ठरले पडद्यामागे
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण आता अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार हे भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्यामुळेच गेले आहेत. असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजित पवार कधी मुख्यमंत्री बनणार याची तारीख देखील समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटाची अडचण झाली आहे.
अजित पवार यांनी २ जुलैला भाजपासोबत सत्तेत सामील होत शरद पवार यांना धक्का दिला. आता तर अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत असे पत्र दाखल केले आहे. पण आता एक नवीन खुलासा समोर आला आहे. रेडिफ ने केलेल्या दाव्यानुसार भाजपाने अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामुळेच अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. संसदेचे पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टला संपल्यानंतर अजित पवार हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत असा धक्कादायक दावा एका इंग्रजी अहवालातून करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांवरील अपात्रची याचिका प्रलंबित आहे. जर ते अपात्र ठरले तर सर्व जणांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल. यानंतर अजित पवार शिंदेंची जागा घेतील आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. हा सगळा फॉर्म्युला केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने ठरवण्यात आल्याचे अहवालात म्हंटले आहे. म्हणजे संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर नार्वेकर या विषयावर आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे अजित पवार अमित शहांबरोबर २० जुन २०२२ पासून संपर्कात होते. अखेर मुख्यमंत्री पदाचा शब्द भेटल्यानंतरच अजित पवार सत्तेत सामील झाले.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, विद्यमान मुख्यमंत्री लवकरच पदावरून बाजूला होतील आणि त्यांच्या जागी पवार येतील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल घडण्याची शक्यता आहे. पण आता एकनाथ शिंदे काय करणार हे पहावे लागणार आहे.