मोठी बातमी! शिंदे गट काँग्रेससोबत युती करणार?
शिंदे गटाकडून युतीचा प्रस्ताव, काँग्रेस ती अट मान्य करणार, शिंदे गटाची अट काय?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंना यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती अमान्य असल्याचे सांगत एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली पण आता भाजप अजितदादांना जवळ करत असल्याने शिंदे गटाने थेट काँग्रेसलाच युतीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. मात्र, त्याच काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. पण राहुल गांधींनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंचे पद राहणार की नाही अशीच शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांची वक्तव्येही नरमाईची येत आहेत. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण यामुळे राजकारणात पडद्यामागच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांना संजय राऊत सारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडीत भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना हिंदुत्व करता केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही असेही पाटील म्हणाले आहेत.