Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पतीच्या खुनानंतर पत्नीने केली आत्महत्या

पत्नीच्या आत्महत्येमुळे पोलिसांसमोरील गुंता वाढला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट, मिठबाव प्रकरणात वेगळे वळण

सिंधुदूर्ग दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्र गणेशउत्सवात व्यस्त असताना कोकणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण हत्याकांड आणि आत्महत्येने सिंधुदूर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीसांसमोरील आव्हाने वाढली आहेत. मालवण पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

मिठबाव येथील प्रसाद लोके याचा चार दिवसांपूर्वीच मुणगे मशवी रस्त्यावर निर्घृणपणे खून झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद लोके याची पत्नी मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके हिने गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे. मनवाने पतीच्या मृत्यूमुळे निराश आणि तणावग्रस्त होऊन आत्महत्या केली असे सांगितले. पण या घटनेमुळे मात्र, या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. सविस्तर माहितीनुसार मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके यांचा सोमवारी सकाळी मुणगे-मसवी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्रसाद यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या हत्येप्रकरणी किशोर परशुराम पवार याला अटक केली होती. याचा पुढचा तपास पोलीस करत असतानाच प्रसादची पत्नी मनवाने ओढणीच्या साहाय्याने टेरेसवर शेडच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पतीच्या घातपाती मृत्यू प्रकरणानंतर तीन दिवसांनी पत्नीने गुढरित्या आत्महत्या केल्यामुळे पोलिसांसमोरील गुंता अजून वाढला आहे. विशेष म्हणजे प्रसाद लोके, किशोर पवार व पत्नी मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके हे तिघेही एकमेकाच्या परिचयाचे होते. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!