Latest Marathi News
Ganesh J GIF

अजबच! भाजपाचे खासदार म्हणतायेत गुटखा खा, दारू प्या, पण पाणी…

जल संवर्धनावरुन भाजपा खासदाराचे अजब वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल

रेवा दि ८(प्रतिनिधी)- भाजपा आणि मित्रपक्षाच्या नेत्यांची बेताल विधाने थांबण्याचे नाव घेत नाहीत. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार यांच्यानंतर भाजपा खासदाराने आपल्या अकलेचे तारे तोडत पाणी बचतीसाठी नागरिकांना दारु आणि गुटखा खाण्याचे विचित्र आवाहन केले आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

जल संवर्धनाच्या मुद्द्यावरुन मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपा खासदार जनार्धन मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. ते म्हणाले “जमिनीतील पाणी आटत चाललं आहे. त्यामुळे पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा… पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या”, असं वक्तव्य मिश्रा यांनी केले आहे. त्याचबरोबर “पाण्याव्यतिरिक्त कुठल्याही कराची माफी द्या. मात्र, पाणीपट्टी आम्ही भरू, असं एखाद्या सरकारनं पाणीपट्टी माफीची घोषणा केल्यावर सांगा” असे म्हणत. त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. या कार्यक्रमातील जनार्धन मिश्रा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिश्रा यांनी याआधीही बऱ्याच वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेतला आहे. हातांनी शौचालयाची साफसफाई करतानाचा त्यांचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. पण देशातील राजकारणात नेत्यांचा अजब वक्तव्यांची मालिकाच सुरु असल्याचे चित्र आहे. त्यात भाजपा नेते आघाडीवर आहेत. त्यामुळे संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!