पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
अभ्यासिकेत झालेली ओळख ठरली त्रासदायक, तरुणीसोबत काय घडले
पुणे दि ८(प्रतिनिधी)- पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. पण याच पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

लग्नाचे अमिष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी रुपेश राजाभाऊ व्हावळे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश आणि पीडित तरुणी दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आले होते. या दोघांची ओळख एका अभ्यासिकेत झाली. सततच्या भेटीमुळे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी रुपेशने विवाहाचे आमिष दाखवत तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने लग्नाला साफ नकार दिला तसेच पीडित तरुणीला बेदम मारहाण केली. त्यानंतर धक्का बसलेल्या तरूणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर रुपेशच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील फरासखाना पोलीसांनी तरूणाला अटक करत कारवाई सुरु केली आहे आरोपी रुपेश परळी वैजिनाथवरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला होता. तर तरूणीही त्याच कारणासाठी पुण्यात आली होती. त्यामुळे तरुणींनी काळजी घेण्याची गरज आहे.