डोंबिवली दि १६ (प्रतिनिधी)- अहिंसा सारखं दुसर शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म: चे आम्हाला एतक्या वेळा सांगण्यात आले की हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही’, असे वादग्रस्त विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.डोंबीवलीतील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. पोंक्षे याआधीही वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडले आहेत.
अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. आज आम्हाला राग येत नाही, चिड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटते हा घोर अपमान आहे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे त्यांचाही अपमान आहे असे पोंक्षे म्हणाले आहेत.यावेळी त्यांनी मुस्लीम धजिर्नी धोरणांवरही टीका केली आहे. तसेच मराठी चित्रपटांना थिएटर भेटत. नसल्याचा संताप व्यक्त केला आहे.
शरद पोंक्षे सावकरप्रेमी म्हणून ओळखले जातात मध्यंतरी त्यांनी सावकर प्रेमी आला की दहशत वाटायला हवी असे मत मांडले आहे. तसेच नथुराम गोडसे बाबतही पोंक्षे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. पोंक्षे यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे.