Latest Marathi News
Ganesh J GIF

भीमा पाटस कारखान्यावरुन भाजपाकडुन राहुल कुल यांची कोंडी

भीमा पाटस कारखान्याची श्वेतपत्रिका काढा, भाजप नेत्याची मागणी, बघा प्रकरण

दाैंड दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५०० कोटीचे आरोप केले आहेत. पण आता भाजप नेत्याच्या मागणीमुळे आमदार राहुल कुल यांची कोंडी झाली आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांसमोर येण्याकारिता श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि कारखान्याचे माजी संचालक वासुदेव काळे यांनी केली आहे. यामुळे राहुल कुल यांची कोंडी झाली आहे.स्वपक्षातूनच त्यांना आव्हान देण्यात आले आहे.

वासुदेव काळे म्हणाले की, “राहुल कुल हे स्वपक्षाचे आमदार असले तरी अध्यक्ष म्हणून मी त्यांना यापूर्वी देखील कारखान्याच्या आर्थिक स्थिती व धोरणांविषयी सतत प्रश्न केले आहेत. परंतु ठोस उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.आपण कारखान्याच्या निवडणुका लढवून सभासदांची बाजू मांडलेली आहे. कारखान्याची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे व त्याला कोण जबाबदार आहे , हे समजून घेण्याकरिता श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असेही काळे म्हणाले. तसेच तीन गळीत हंगाम बंद राहिलेला भीमा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीस चालविण्यात देण्यात आला आहे. मात्र, तो सहकारी साखर कारखाना राहावा, ही भूमिका आणि अपेक्षा आमची आहे. असेही काळे यांनी म्हटले आहे. याच मुद्द्यावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनीही खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप हे कसे बरोबर आहेत असे ठामपणे सांगत मीडिया समोर आमदार कुल यांनी सभासद व कामगारांच्या मालकीच्या कारखान्यात कसा कारभार केला याचा लेखाजोखा सांगितला होता.

खासदार संजय राऊत यांनी केलेले हे आरोप आमदार राहुल कुल यांनी फेटाळून लावले आहेत. मात्र आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्यात पारदर्शक कारभार केला आहे, तर मग चौकशीला समोर दाखवण्याची तयारी दाखवून भ्रष्टाचार झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे असे आव्हान ताकवणे यांनी दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!