Just another WordPress site

बहुचर्चित ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात मुस्लीम पक्षाला झटका

न्यायालयाचा निकाल हिंदूच्या बाजूने, पुढील सुनावणी 'या' तारखेला

वाराणसी दि १२ (प्रतिनिधी) – देशातील बहुचर्चीत ज्ञानवापी मशीदीप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. हिंदू पक्षाच्या बाजूने न्यायालायने निर्णय घेतला असून हे प्रकरण सुनावणी योग्य असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचवेळी मुस्लिम पक्षाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ज्ञानवापी मशिदीप्रकरणी पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.

GIF Advt

वाराणसीतील ज्ञानवापी मशिद परिसरातील माँ श्रृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेच्या मागणीसाठी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरोधात मुस्लिम पक्षाने खटला फेटाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे.  या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शहरात कलम १४४ लागू करण्यात आला होता. तसेच वाराणसीतील ज्या भागात हिंदू- मुस्लीम समाज राहतो त्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.पाच महिलांनी एकत्र येत ज्ञानवापी मशिदीच्या मागच्या दिशेला असलेल्या शृंगार गौरीची दररोज पूजाअर्चा करता यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी प्लॉट नंबर ९१३०चे सर्वेक्षण आणि व्हीडिओग्राफीची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मंजूर करत कोर्टानं सर्वेक्षण आणि व्हीडिओग्राफीचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते.

या निकालानंतर “हा हिंदू समाजाचा विजय आहे. पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी आहे. ज्ञानवापी मंदिराची ही पायाभरणी आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.” असं ज्ञानवापी मस्जीद प्रकरणातील याचिकाकर्ते सोहन लाल आर्य यांनी म्हटलं आहे.आता सर्वांचा नजरा २२ तारखेकडे असणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!