Just another WordPress site

‘हल्ले करू नका शेवटी तुम्हालाही मुंबईतच राहायचे आहे’

प्रभादेवीच्या राड्यानंतर भाजपच्या या नेत्यांची उद्धव ठाकरेंना इशारा, वातावरण तापणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- गणेश विसर्जानादिवशी दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा पाहण्यास मिळाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या घरी पोहोचत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. ‘मातोश्री’च्या दुकानात बसून फक्त तक्राराची मार्केटिंग सुरू आहे असे हल्ले बिल्ले करू नका शेवटी तुम्हाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं आहे, असा इशारा राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला आहे. या वादात राणे यांची एंट्री झाल्यामुळे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे.

गणेश विसर्जानादिवशी शिवसेना आणि शिंदेगटात जोरदार राडा झाला. यावेळी बंडखोर आमदार सदा सारवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शिंदे गटाशी भिडणाऱ्या शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवत काैतुक केल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. तर आज या वादात राणे यांनी एंट्री मारली आहे. राणे म्हणाले की, “गोंधळ आणि अस्वस्थता यामध्ये फरक आहे. सदा सरवणकर माझे जवळचे सहकारी आहेत म्हणून त्यांची मी भेट घेतली. जी घटना घडली त्याची दखल घेणं आमचं काम आहे. तक्रार दिलीय तर चौकशी करतील, फायरिंग झाली तर कळतं ना? सेनेला तक्रार केल्याशिवाय काही उरलं नाही, मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्राराची मार्केटिंग सुरू आहे असे हल्ले बिल्ले करू नका शेवटी महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं आहे. मुंबईअशा प्रकारची लुटपुट चालू देणार नाही” असा इशाराच राणेंनी ठाकरेंना दिला आहे. शिंदे गट आमचा मित्र पक्ष असल्यामुळे आपण त्यांची भेट घेतली असे म्हणत एकनाथ शिंदेच दसरा मेळावा घेतील असे राणे म्हणाले आहेत.

GIF Advt

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर न्यायालयात सुरू झालेली लढाई आता रस्त्यावर होऊ लागली आहे. पण सारवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यावेळी ठाकरेंनी राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे काैतुक करताना शिवसैनिक हेच आमचे ब्रम्हास्त्र म्हणत काैतुकाची थाप टाकली. पण आता राणेंनी या प्रकरणात उडी मारल्याने नवा ट्विस्ट आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!