Latest Marathi News
Ganesh J GIF

नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसीचे फलक

कर्जत-जामखेड एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर, युवकांचे थेट मोदींना साकडे

पुणे दि १(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकावल्याने सध्या कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे व या फलकांनीच सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

फलकांवर “आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासन हे कर्जत – जामखेड येथील एमआयडीसी संदर्भात वेळकाढूपणा करत आहे. आपण देशाचे मोठे नेते आहात युवकांचा विचार करून एमआयडीसी संदर्भात तातडीने योग्य निर्देश देऊन मान्यता द्यावी ही विनंती – सर्वसामान्य युवक (कर्जत जामखेड)” अशा पद्धतीने मजकूर लिहिलेला फलक हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या दरम्यान पुण्यात कर्जत जामखेडच्या युवकांकडून झळकावण्यात आला आहे. एकीकडे राज्य सरकार कर्जत जामखेडच्या एमआयडीसीला अधिसूचना काढून मंजुरी देत नसतानाच दुसरीकडे आता थेट पंतप्रधान मोदींनाच मंजुरी बाबतची विनंती केल्याने एकच चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच कर्जत जामखेड मतदार संघातील युवांनी मंजुरीसाठी साकडे घातल्याने सध्या याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भाजप आमदार राम शिंदे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देखील दिले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!