Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसच्या या नेत्याकडे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

मातब्बर नेत्यांना धोबीपछाड देत या नेत्याने मारली बाजी, अधिवेशनाच्या उत्तरार्धात निर्णय, मोठी खेळी

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. त्यांनंतर संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद गेले होते.

आमदारांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. पंरतु अधिवेशन सुरू झालं तरी काही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नव्हते. अंतर्गत गटबाजीमुळे विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होत नव्हते. या पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांची नावे चर्चेत होतीत. मात्र काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवारांकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. याआधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे हे पद देण्यात आले होते. दरम्यान अधिवेशनात काँग्रेस नेते मात्र कमालीचे आक्रमक दिसले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले या ज्येष्ठ नेते मंडळींनी विरोधकांचा आवाज कायम ठेवला होता. त्यामुळे यापैकी एका नेत्याकडे ही जबाबदारी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. मागील जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात मोठे बंड घडवले. या घडामोडीत काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटली. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वडेट्टीवार यांच्याकडे मदत पुनर्वसन, खार जमिनी विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण या विभागांची जबाबदारी होती. विजय वडेट्टीवार ओबीसी नेते असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!