Latest Marathi News
Ganesh J GIF

नळदुर्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नळदुर्ग पोलिसांनी २५ लाख ९२ हजाराचा गुटख्याने भरलेला आयशर पकडला

नळदुर्ग (सतीश राठोड ) : – धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे . नळदुर्ग येथील दिल्ली दरबार हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर टेम्पोत २५ लाख ९२ हजार रूपये किमतीचा गुटखा व १० लाख रुपये किमतीचे आयशर टेम्पो असा एकूण ३५ लाख ९२ हजार रुपयाचा मुद्देमाल नळदुर्ग पोलिसांनी जप्त केला आहे.

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व व त्यांचे पोलीस पथकाने सदर वाहन पकडून मोठी कारवाई केली असुन वाहन चालकावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नळदुर्ग पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की १ मार्च २०२३ रोजी एका गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीनुसार आयशर टेम्पो क्रमांक के ये ३२ सी ३८६३ यास हॉटेल दिल्ली दरबार समोरील राष्ट्रीय महामार्गावर पोलीस पथकाने अडवून त्यास चेक केले असता सदर आयशर टेम्पो मध्ये गुटखा सदृश्यपदार्थ असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने सदरचा टेम्पो दिल्ली दरबार येथील पार्किंग मध्ये लावून दोन पंचांना बोलावून घटनास्थळ पंचनामा केला असता सदर आयशर टेम्पोचा क्रमांक के ए ३२ सी ३८६३ असा असून त्याबाबतचे कागदपत्रे टेम्पोचा चालक निजामोद्दीन मोहम्मदसाब अन्सारी वय ३५ वर्ष राहणार न्यू अन्सारी मोहल्ला आळंद जिल्हा गुलबर्गा यांनी टेम्पोचा मागील दरवाजाचे कुलूप खोलून दाखविले असता सदर आयशर टेम्पो मध्ये एकूण 40 पांढऱ्या रंगाच्या मोठ्या पोत्या मध्ये गुटखा सदृश्यपदार्थ मिळून आला सदर गुटखा सदृश्यपदार्थाच्या पॅकिंगवर R ROYAL 1000 असे लिहिलेले मिळून आले . त्यामध्ये २५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असुन १० लाख रुपये किमतीचे आयशर टेम्पो असा एकूण ३५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . सदरील आयशर टेम्पो व त्यातील गुटखा सदृश्यपदार्थ पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले .

याबाबत नसरीन तनवीर मुजावर वय ४३ वर्षे व्यवसाय सरकारी नोकरी सहा . आयुक्त कार्यालय जुन अग्निशामक दलाजवळ , अन्न व औषध प्रशासन धाराशिव सरकारतर्फे फिर्यादी होऊन पोलीस ठाणे नळदुर्ग येथे २ मार्च रोजी वाहन चालक निजामुद्दीन मोहम्मद साहब अन्सारी वय वर्ष ३५ राहणार न्यू अन्सारी मोहल्ला आळंद जिल्हा गुलबर्गा यांच्यावर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नळदुर्ग पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत . पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत .

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!