Latest Marathi News

बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री या उद्योगपतीला करतेय डेट?

अभिनेत्रीची सोशल मिडीयावरील कृती चर्चेत, फोटोग्राफरला पाहताच ती कृती, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तसेच ती आपले खासगी आयुष्य लोकांपासून लपवताना दिसत आहे. भूमी पेडणेकर व्यावसायिक यश कटारियाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच त्या दोघांचा मुंबई विमातळावरील व्हिडीओ समोर आलेला आहे.


भुमी आणि तिचे नाव ज्याच्यसोबत जोडले जाते, तो यश कटारिया एकाचवेळी विमानतळाबाहेर पडले. भुमी आणि तिचा बायफ्रेंड यश यांचा एक व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत भूमि आणि यश हे दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. पण ते एकत्र दिसले नाही तर ते वेगवेगळे बाहेर आले. पण शेवटी पार्किंग परिसरात ते एकत्र दिसले. पण यात महत्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहताच ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर पार्किंग परिसरात दोघेही एकत्र आले आणि एकाच गाडीमधून बसून एकत्र बसून गेले. दरम्यान या आधी भूमिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत भूमि यशसोबत दिसली होती. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत ते लिप लॉक करताना दिसले होते. यश हा एक बिल्डर आहे. तर तो रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा चांगला मित्र आहे. त्यांच्या माध्यमातूनच त्याची आणि भुमीची भेट झाली होती. सोशल मिडीयावर काहीजण यांचे काैतुक करत असुन काहीजण ट्रोल करत आहेत.

भुमी ‘भीड’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. ज्यामध्ये भूमी राजकुमार रावबरोबर प्रमुख भूमिकेत होती. आता भूमी ‘द लेडी किलर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अनेक प्रोजेक्ट
करत असुन ती आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!