लोकलनंतर आता मेट्रोतही पुरुषांची जोरदार हाणामारी
हाणमारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, वैतागलेल्या प्रवाशांनी केले असे की...
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- मेट्रो आणि त्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी कायमच चर्चेचा विषय असतात. त्याचे सोशल मिडीयावर व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. पण आता मेट्रोमध्ये पुरूषांची थेट फायटिंगचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
आता मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यावेळी जागा पकडण्यासाठी आणि उभे राहण्यावरुनही कायमच वाद होत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन प्रवासी एकमेकांवर लाथा बुक्क्यांनी हाणामारी करत आहेत. त्यांची ही हाणामारी होत असताना त्याचा त्रास इतर प्रवाशांना देखील होत आहे. अखेर वैतागलेल्या प्रवाशांनी यांची होणारी फ्री स्टाईल हाणामारी बघून मध्ये पडत दोन हाणामारी करणाऱ्या प्रवाशांना धरून ठेवले. स्टेशन येताच दोघांपैकी एक जण खाली उतरला. मग दुसऱ्याला लोकांनी सोडलं. ही संपूर्ण घटना डब्यातील इतर प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. पण हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी त्याची मजा घेताना दिसत आहे.
A fight broke out between two people on @OfficialDMRC Violet Line. #viral #viralvideo #delhi #delhimetro pic.twitter.com/FbTGlEu7cn
— Sachin Bharadwaj (@sbgreen17) June 28, 2023
लोकांना झटपट प्रवास करता यावा यासाठी मेट्रोची सुरूवात झाली होती. पण ही मेट्रो आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असते. मध्यंतरी महिलांची स्प्रेने होणारी हाणामारी चर्चेत आली होती. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.