Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदेना धक्का देत अजित पवार आणि भाजपाचे जागा वाटप ठरले

राष्ट्रवादी ९० तर भाजपा लढवणार एवढ्या जागा, शिंदे गटाला वाटण्याचा अक्षता, शिंदे गट अस्वस्थ

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी आज आपल्या गटाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मोठे गाैप्यस्फोट केले आहेत. यावेळी भाजपा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार यांच्या सोबत सत्ता स्थापन करण्यास उत्सुक होती. असे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार यांनी भाजपा बरोबर सत्तेत सामील होताना सगळी चर्चा करुन निर्णय घेतले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या एंट्रीने एकनाथ शिंदे आणि गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

अजित पवार यांनी आज शक्तीप्रदर्शन करताना मोठे वक्तव्य केले आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांचे पद धोक्यात असल्याचा इशारा दिला आहे. पण त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी युतीत ९० जागा लढवेल असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता उरलेल्या जागेत भाजप आणि शिंदे गटात संघर्षाची चिन्हे आहेत. अजित पवार आज म्हणाले की, या पुढच्या निवडणुका या घडाळ्याच्या चिन्हावर लढल्या जातील आणि राष्ट्रवादी राज्यातील ९० जागा लढवेल. त्यापैकी ७१ हून अधिक जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. तसेच पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.  त्यामुळे २८८ पैकी ९० जागा अजित पवार यांच्या गटाने लढल्यास उरलेल्या १९८ जागामध्ये भाजपा आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी किमान १५० जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाला अवघ्या ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गडाकडे अपक्षांच्या मदतीने ५० आमदार आहेत. पण शिंदे गटाचे महत्व अजित पवारांमुळे कमी झाले आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असून लवकरच आणखी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पण या जागा वाटपात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही.

मार्च महिन्यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. भाजप २४० जागा लढवणार आणि शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील असं ते म्हणाले होते. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. आता शिंदे गटाची पुढची रणनिती नव्याने आखावी लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!