Latest Marathi News
Ganesh J GIF

सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम

किरीट सोमय्यांचा स्वतःच्या सरकारलाच घरचा आहेर, धरणे आंदोलनाचा इशारा

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर जर ७२ तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे.त्यामुळे शिंदे सरकारची कोंडी झाली आहे.

ठाकरे सरकार असताना खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा रात्री भेटण्यासाठी २३ एप्रिला २०२२ ला किरीट सोमय्या गेले होते. तेंव्हा सोमय्यांवर खार पोलिस स्टेशच्या परिसरात हल्ला करण्यात आला होता. यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांचा गाडीवर हल्ला करत गाडीची काच फोडली होती. यात सोमय्या किरकोळ जखमी झाले होते. ठाकरे गटाने हा हल्ला केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता संतप्त झाले असून त्यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे. हल्ला झाला होता त्यावेळीही जोपर्यंत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलिस स्टेशनच्या बाहेर पडणार नाही अशी भुमिका सोमय्यांनी घेतली होती. सोमय्या म्हणाले “या प्रकरणात मी उच्च न्यायालयात गेलो होतो. न्यायालयाने पोलिसांना नोटीस दिल्यानंतरही खार पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आहेत. तक्रारीत ६४ लोकांचा उल्लेख होता, मात्र आतापर्यंत कुणालाही अटक झाली नाही. असे ते म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी यावेळी ठाकरे गटावर टिका केली आहे. राहुल गांधी सावरकरांना शिव्या देतात आणि उद्धव ठाकरे सावकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देतात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा भगवा सोडून हिरवा झेंडा हाती घेतला आहे. अशी टिका करत निशाना साधला आहे. दरम्यान आता शिंदे-फडणवीस सरकारकडे या हल्लेखोरांवर काय कारवाई करणार ते पहावे लागणार आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!