Just another WordPress site

एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी

तरुणानंतर तरुणीचाही मृत्यू, बघा नेमक ओैरंगाबादमध्ये काय घडलं

ओैरंगाबाद दि १६(प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना २१ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये घडली होती. आगीत भाजलेल्या प्रियकराचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर उपचार सुरु असताना ५७ दिवसांनी प्रेयसीचीही प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

GIF Advt

पूजा कडुबा साळवे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर गजानन खुशलराव मुंडे असे मृत प्रियकराचे नाव आहे. पुजाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात शिक्षण घेत होती तर गजानन शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात पूजा शिक्षण घेत होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. गजानन हा पूजावर एकतर्फी प्रेम करत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबरला पुजा संस्थेतील प्राध्यापिकेला भेटण्यासाठी गेली होती, याची कुणकुण लागताच गजानन तिचा पाठलाग करत संस्थेत दाखल झाला. जाताना त्याने पेट्रोलची बाटली नेली होती.ती प्रयोगशाळेत असताना गजाननने स्वतःवर पेट्रोल ओतले. उरलेले पुजाच्या अंगावर फेकत स्वतःला पेटवून घेतले आणि पुजाला मिठी मारली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच रात्री उपचारादरम्यान गजाननचा मृत्यू झाला होता. तर पुजाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज रात्री अपयशी ठरली आहे. तिची प्राणज्योत मालवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुजाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. विद्यापीठ आणि पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप पुजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेच्या चार दिवस आधी पुजाने गजानन विरोधात चार पानांची तक्रार नोंदवली होती. तर गजाननने देखील पुजा आणि त्याचे लग्न झाल्याचा दावा करत फसवणूक केल्याचा जवाब पोलिसांना दिला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!