Just another WordPress site

महिलेल्या मारहाण करणाऱ्या त्या मनसैनिकावर गुन्हा दाखल

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कारवाई, मनसेवर विरोधकांची टिका

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपती बॅनर मंडप उभारण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अखेर नागपाडा पोलिसांनी मनसे विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाढ या तिघांना ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपती मंडप उभारण्याच्या कारणावरून एका महिलेला मनसेचे उपविभागीय प्रमुख विनोद अरगिले यांनी मारहाण केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल आहे. त्यासमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब लावण्यात येत होते. मनसे पदाधिकारी विनोद अरगिले आणि इतर सहकारी यावेळेस उपस्थित होते. प्रकाश देवी यांच्या मेडिकल समोर बॅनर लावण्यात येत असताना पीडितेने याला विरोध करण्यास सुरुवात केली. लावण्यात आलेले खांब काढण्याची मागणी केली. त्यावरून वाद वाढला. यानंतर मनसे पदाधिकार्यांने महिलेच्या कानशिलात लगावली. वाद सुरु झाल्यानंतर काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर मोठी गर्दी झाली व परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

GIF Advt

एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे महिला आणि पोलिसांचा सन्मान करा असे सांगत असताना हा व्हिडिओ समोर आल्याने मनसेवर विरोधी पक्षाकडून टिका करण्यात येत आहे शिवाय मनसेची लढाई तनसे सुरू झाली असाही टोला लगावण्यात आला. अखेर घटना घडल्याच्या चार दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!