Latest Marathi News
Ganesh J GIF

१ मेपासून गॅस सिलेंडरच्या दरात बदल? जागतिक घडामोडींमुळे किमती वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री.

जागतिक घडामोडी आणि इंधन पुरवठ्यातील अनिश्चिततेचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे.१ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या वितरण आणि बुकिंग प्रक्रियेत महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता असून, ग्राहकांसाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ अनिवार्य करण्यात येणार आहे.यामुळे गॅस चोरी रोखणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत सिलिंडर पोहोचवणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.’डीएसी’ कोडशिवाय सिलिंडर मिळणार नाही.नव्या नियमानुसार, गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपीसारखा ‘डीएसी’ कोड पाठवला जाईल.हा कोड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला दिल्याशिवाय सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण मानली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर गॅस एजन्सीकडे अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक ठरणार आह.

बुकिंगसाठी किमान अंतराची अट.सिलिंडरच्या बुकिंगमध्येही बदल करण्यात येणार आहेत. एका डिलिव्हरीनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना किमान २५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. तर, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे अंतर ४५ दिवसांपर्यंत असू शकते. या निर्णयामुळे सिलिंडरचा गैरवापर टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.सिलिंडर दर १ हजारांच्या पुढे?मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम एलपीजी दरांवरही दिसून येत आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत सुमारे ५० ते ६० रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून, दर १ हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक १९ किलो सिलिंडरच्या दरातही सतत चढ-उतार सुरू आहेत.जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम.अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत गॅस दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात दरवाढीचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.बायोमेट्रिक ई-केवायसी बंधनकारक.गॅस कंपन्यांनी बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जर ग्राहकांचे केवायसी अपडेट नसेल, तर गॅस बुकिंग थांबवले जाऊ शकते किंवा सबसिडी (अनुदान) बंद होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अधिकृत मोबाईल अॅप्सद्वारे घरबसल्या पूर्ण करता येणार आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना

* गॅस एजन्सीकडे मोबाईल नंबर अपडेट ठेवा

* डिलिव्हरीवेळी ‘डीएसी’ कोड तयार ठेवा

* वेळेत ई-केवायसी पूर्ण करा

* बुकिंगमधील अंतराचे नियम पाळा

१ मेपासून लागू होणारे नवे नियम ग्राहकांसाठी सुरुवातीला त्रासदायक वाटू शकतात, मात्र गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचबरोबर दरवाढीची शक्यता लक्षात घेता, सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवरही याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!