Latest Marathi News
Ganesh J GIF

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाची काॅपीसाठी वसुली

विद्यार्थ्यांकडून पाचशे रूपये लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, काॅपीमुक्त अभियानाचा फज्जा

गडचिरोली दि ९(प्रतिनिधी)- राज्यात बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून बोर्डाने उपाययोजना देखील केल्या होत्या. पण बुलढाणात पेपर फुटल्यानंतर आता गडचिरोलीत देखील सरसकट प्राध्यापकाच्या कृपेने काॅपी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखाने बारावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये घेतले आहेत. यातीलच एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला पैसे देतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी कुरखेडा येथे प्राध्यापक किशोर कोल्हे यांची परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी काॅपी करण्याची परवानगी देताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाचशे रुपये घेतले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना पैसे दिले त्यांचे नाव व मोबाइल नंबर ते लिहून घेत आहेत. पैसे देतेवेळी सात ते आठ विद्यार्थी होते. त्यांच्यापैकी एकाने हा व्हिडिओ शुट केला. याप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून त्यांना तात्काळ केंद्रप्रमुखपदावरून दूर केले व पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काॅपीचा प्रकार समोर आला होता.

 

दहावी व बारावीच्या परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा दावा प्रशासनाने केला होता.पण संपूर्ण राज्यातच काॅपीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे. बुलढाण्यात तर चक्क पेपरच फुटला होता. त्याच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!