Latest Marathi News
Ganesh J GIF

भंडाऱ्यांतील शेतामध्ये वाघाचा धुमाकूळ, वनकर्मचा-यावर हल्ला

वाघाचा धुमाकूळ घालताना व्हिडिओ व्हायरल, मोठ्या शर्थीने वाघ जेरबंद

भंडारा दि ९(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात दोन महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघाने परत आपली दहशत निर्माण केली आहे. त्याच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एक महिन्यापूर्वी वनविभागाने वाघाला जेरबंद करत जंगलात सोडले होते. मात्र पुन्हा एकदा वाघ धोप परिसरात आढळला आहे. गावातील शेतात वाघ आल्याची माहिती होताच वाघ बघण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी केली. त्यामुळे वाघ आणखीन बिथरला. तर त्याला हुसकून लावण्यासाठी गावकरी त्याच्या मागे धावले. त्यावेळी वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. पण नागरिकांनी गलका केल्याने वाघ माघारी फिरला. त्यावेळी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर देखील वाघाने हल्ला केला.वाघाच्या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मदन हिरापुरे असे त्यांचे नाव आहे. वाघाच्या धुमाकूळाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर वाघाला काल रात्री मोठ्या प्रयत्नांची शिकस्त करून वनविभागाच्या विशेष पथकाद्वारे जेरबंद करण्यात आले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!