Latest Marathi News
Ganesh J GIF

क्रिकेटपटूच्या पत्नीचा पाठलाग करत वाहनाला धडक

महिला सुरक्षेचा वाऱ्यावर, पोलिसांचे अजब उत्तर, नक्की काय घडले? वाचा

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- इंडियन प्रीमियर लीग कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज नितीश राणा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. असे असतानाच राणा याच्या कुटुंबाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणाच्या पत्नीचा दोन तरुणांनी रात्रीच्या वेळी पाठलाग केल्याची घटना दिल्लीत घडली आहे.


साची मारवाह ही नितिश राणाची पत्नी आहे. साची मारवाह ही आपल्या कारमधून घराच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. तिने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीनुसार ही घटना दिल्लीतील कीर्ती नगर परिसरातील आहे. दोन अज्ञात तरुण तिचा पाठलाग करताना दिसून आले आहेत. इतकेच नव्हे तर पाठलाग करत असताना त्यांनी तिच्या कारलाही धडक दिली आहे. रस्त्यावरून जात असताना कोणीतरी आपल्या मागे येत आहे इथपर्यंत ठीक होतं. मात्र ती जिथे जात होती तिथेच हे दोन तरुण येत असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी धडक मारल्यानंतर ती आणखी घाबरली. तिने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीसांनी अजब उत्तर दिले आहे. सांची मारवाहने दिल्ली पोलिसांकडे तिच्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार केली तेव्हा त्यांनी तिला हे विसरून जाण्यास सांगितले. सध्या तुम्ही सुखरूप घरी पोहोचला आहात तर आता ही गोष्ट सोडून द्या, पुढच्या वेळी असं काही झाल्यास वाहनाचा नंबर लिहून ठेवा, असा सल्ला दिल्ली पोलिसांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सांची आणि नितीश यांचा विवाह २०२० मध्ये झाला आहे. पण सांची सध्या पूर्ण दहशतीत आहे. अद्याप नीतिश राणा याने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नितीश राणाची पत्नी साची मारवाह व्यवसायाने इंटिरियर डिझाइनर आहे. नितीश आणि साचीची केमिस्ट्री उत्तम आहे. साचीने अंसल विद्यापीठाच्या सुशांत स्कूल ऑफ डिजाइन इथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. साचीने अनेक नामांकित इंटिरियर डिझाइनर्सकडून प्रशिक्षणही घेतलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!