Latest Marathi News
Ganesh J GIF

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे चित्रा वाघ यांची गोची

विरोधकांसह नेटक-यांकडून चित्राताईंवर टिका आणि मिम्सचा महापूर

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. मात्र पुजा चव्हाण आत्महत्येमुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ राठोडांच्या राजीनाम्यासाठी आक्रमकपणे समोर आल्या होत्या. पण आता पुन्हा संजय राठोड यांना शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे वाघ यांची चांगलीच गोची झाली आहे.वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद देणे दुर्दैवी असल्याचे म्हणत आक्षेप नोंदवला आहे.पण सोशल मिडीयावर मात्र वाघ राठोड यांना राखी बांधणार का? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले की, पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही त्यांच्याविरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास.. लडेंगे….जितेंगे. असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातून पुणे पोलिसांकडून क्लीन चीट मिळाल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विस्तारानंतरही शिंदे फडणवीस सरकारमध्ये बेबनाव असल्याचे समोर आले आहे. वाघ यांनी लढा देऊ असं सांगितल असल तरीही विरोधकांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाना साधला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. आता चिवा ताई कुठे आहेत बघावं लागेल, चंद्रकात पाटील कुठे आहेत तेही बघाव लागेल. ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले त्याच नेत्यांना परत मांडीवर घेतात याचा अर्थ काय समजायचा? असे म्हटले आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पूजा चव्हाणला न्याय देण्यासाठी आपण लढा देऊया असे म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. ७ फेब्रवारी २०२१ला तिने पुण्यात आत्महत्या केली होती.वाघ यांनी पहिल्यांदा राठोड यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे राठोड यांना ठाकरे सरकारमधील मंत्रिपद सोडावे लागले होते

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!