Just another WordPress site

भाजपाची साथ देताच घोटाळ्यांचे आरोप असणाऱ्या नेत्यांना क्लिनचिट

शशी थरुर यांनी यादीच दाखवली, यादीत राणे, जाधव सरनाईकही, यादी व्हायरल

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- भाजपात प्रवेश केला किंवा त्यांची साथ दिली तर कोणतीही चाैकशीचा ससेमिरा मागे लागत नाही. शिवाय चांगली झोप लागते असे बोलल्याचे भाजपा नेत्यांचे व्हिडिओ याआधी व्हायरल झाले आहेत. पण ज्यांच्यावर आधी घोटाळ्यांचे आरोप झाले, ते पुढे भाजपात गेल्यानंतर क्लिन चिट दिल्याचे समोर आले आहे.

घोटाळ्यांचे आरोप असणाऱ्या नेत्यांना क्लिनचिट देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते शशि थरुर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. शशि थरुर यांनी ट्विट करत आठ मंत्र्यांच्या नावाची यादी दिली आहे. ज्यांच्याविरोधात चौकशी सुरु होती, पण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची चौकशी बंद करण्यात आली.
शशि थरूर यांनी ट्विटरवर आठ नेत्यांच्या नावाची यादी दिली आहे. यात महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आणि बंगालचे शुभेंदु अधिकारी यांचा समावेश आहे. कायद्यासमोरील हीच काय समानता आहे? असा सवालही त्यांनी या पोस्टमधून केला आहे.

GIF Advt

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयच्या अटकेनंतर सिसोदिया यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यानंतर थरुर यांनी नेहमीच ना खाऊंगा, ना खाने दुंगा या घोषणेचं आश्चर्य वाटतं. मला वाटतं ही घोषणा केवळ बीफच्या अनुषंगानेच असावी असे म्हणत ट्विट वार केला आहे. सध्या या ट्विटची चर्चा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!