Latest Marathi News

भाजपाचे ८० ते८५ आमदार बंड करणार होते पण….

अजितदादांचा विधानसभेत मोठा गाैप्यस्फोट, भगतसिंग कोश्यारीचा दाखला देत म्हणाले..

मुंबई दि १(प्रतिनिधी)- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विविध विषयांवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. विविध मुद्दयांवरुन सरकारला जाब विचारताना अजित पवारांनी भाजपाबाबत एक मोठा गाैप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांचे बंड नंतर भाजपाच्या साथीने स्थापन केलेले सरकार यावर बोलताना अजितदादांनी राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या काळातील एक प्रसंग सांगत भाजपला कोंडीत पकडले. ते म्हणाले, “आठ महिन्यांपूर्वी हे सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. त्यानंतर पहिला झटका बसला. भाजपच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असं वाटत होतं.पण तसे न झाल्यामुळे भाजपाचे आमदार नाराज झाले. भाजपाच्या ८० ते ८५ आमदारांनी बंड करायचं का असं म्हटलं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी असले काही करु नका, त्या दोघांना कळले तर सगळा सुपडा साफ होईल. असे म्हणत त्या आमदारांची समजूत काढली असा दावा पवारांनी केला आहे. त्यामुळे भाजपातही सगळी सुरळीत नसल्याचे समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माझ्याशी बोलताना हे काय होऊन बसले असे विचारले होते असाही दावा अजित पवार यांनी केला. तसेच पुण्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणखी एक गाैप्यस्फोट करणार असल्याचे अजितदादा म्हणाले आहेत. यावेळी अरबी समुद्रातातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काय झालं, असा सवाल विचारत शिंदे सरकारची शाळा घेतली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!