Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसचे मा. आमदार करणार भाजपात प्रवेश, काँग्रेसला धक्का

फडणवीसांना आव्हान देणारा नेत्याचा भाजपात प्रवेश, मुहूर्त ठरला, नाना पटोलेंची मतभेदामुळे काँग्रेसला रामराम

नागपूर दि १७(प्रतिनिधी)- काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुख उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसने देशमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. एकप्रकारे माजी आमदार देशमुख यांची घरवापसी होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी निश्चित वाढणार आहेत.

कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांचा घरवापसीचा मुहूर्त ठरला होता.वआशिष देशमुख यांना फार मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र आहेत. विशेष म्हणजे देशमुख हे भाजपात असताना आमदार झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने सावनेरऐवजी काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करत विजय मिळविला होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी भाजपाशी फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यांनी फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली होती. पण आता नाना पटोले यांच्याशी मतभेद झाल्यामुळे ते पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान आशिष देशमुखांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता ते कोणत्या मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवणार असा प्रश्न चर्चिला जात आहे.

आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी पक्षाने त्यांना समज दिली. पण त्याच्या त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यांना ६ वर्षांकरता पक्षातून निलंबित केले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!