Just another WordPress site

कोयता गँगला पोलिसांना दाखवला खाकी हिसका

पोलीस कारवाईचा व्हिडीओ व्हायरल, कोयता गँगला घडवली अद्दल

सातारा दि २४(प्रतिनिधी)-  पुणे शहरात कोयता गँगची दहशत आहेच पण हे लोण आता इतर शहरातही पोहोचत आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारधार कोयते हातात नाचवत पोवई नाक्याच्या भर चौकात दहशत निर्माण केल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. पण पोलीसांनी तातडीने कारवाई केल्याने कोयता गँगला दणका बसला आहे.

कोयता गँगकडून सर्वसामान्यांना आणि वाहन चालकांना कोयता उगारुन लुटमारीचा प्रकार केल्याने पोवई नाका हादरुन गेला होता. यावेळी गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला असता एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पण पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इतर संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विनायक मनवी असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशत माजवणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले तर इतरांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलीसांनी कोयता गँगला दाखवलेल्या हिसक्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.दरम्यान या कोयता गँगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातारकर करत आहेत.

GIF Advt

पुणे येथील सिंहगड रस्त्यावर कोयता नाचवून दहशत करणाऱ्या गुंडांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.तशीच पद्धत साता-यात वापरल्याने पुण्यातील कोयता गँगचे साताऱ्यातील कोयता गँगशी काही संबंध आहेत का याची देखील सातारा पोलीस माहिती घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!