Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल, लोक संतापले

अभिनेत्रीच्या व्हिडीओमुळे सलमान खानवर जोरदार टिका, अभिनेत्रीचे चाहतेही नाराज, नेमके काय घडले?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन विश्वातील सर्वात वादग्रस्त शो म्हणून बिग बाॅसकडे पाहिले जाते. बिग बाॅस पहिल्या सिझनपासूनच वादात राहिलेला शो आहे. ही वादाची परंपरा सतराव्या सीझनमध्ये देखील सुरू आहे. एवढेच नाहीतर बिग बाॅसचा ओटीटी सिझनदेखील वादग्रस्त राहिलेला आहे. या शोमधील दोन स्पर्धकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या व्हिडिओमुळे बिग बाॅसचा होस्ट सलमान खानदेखील अडचणीत आला आहे.

बिग बाॅसमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल यांचा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवारी ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यातील लव्हट्रँगलबाबत ईशाची चांगलीच कानउघाडणी केली. ईशा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी दोन मुलांसोबत प्रेमाचं नाटक करत असल्याचा खुलासा सलमानने केला होता. याचदरम्यान सलमानने ईशाचा गेम प्लॅन उघड केला आणि सांगितले की समर्थ आणि अभिषेकने तिच्या मागे भांडावे अशी तिची इच्छा आहे. सलमानने फटकारल्यानंतर आता ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून नेटिझन्स चांगलेच संपातले आहेत. रात्री घरातील लाईट्स बंद झाल्यानंतर दोघंही एकमेकांकडे बघत एकाच बेडवर झोपले होते. तेवढ्यात समर्थने ईशाला किस केल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ईशा आणि समर्थचा हा एकच व्हिडीओ नाही असे अनेक व्हिडीओ आहे ज्यामध्ये ते यापूर्वी एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसले आहेत. पण आता समोर आलेल्या या व्हिडीओवरून या दोघांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ईशा-समर्थ यांची व्हायरल क्लिप X (ट्विटर)वर व्हायरल होत आहे. बिग बॉस फॅनपेजवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘निब्बा निब्बी बिग बॉस आता वेगळ्या शोमध्ये बदलत आहे…’ असं लिहिले आहे. दरम्यान सलमान खान बिग बाॅस हा फॅमिली शो असल्याचा दावा करतो. पण शोमध्ये अशा गोष्टी होत असल्याने सलमानवर देखील टिका होत आहे. ‘हा आहे का तुमचा फॅमिली शो’ अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.तर ईशावर देखील टिका होत आहे. ‘१९ वर्षांची मुलगी इतकी निर्लज्ज कशी असू शकते? ईशाने स्वत:चं जेवढं नुकसान केलं आहे तेवढी कोणीही स्वतःची प्रतिमा खराब केली नसेल…’ अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

शनिवारी मनस्वी ममगई शोमधून आऊट झाली आहे. कमी वोट मिळाल्याने तिला बाहेर पडावे लागले. एक आठवड्यातच तिला बाहेर जावं लागल्याने तिचे चाहते निराश झालेत. या आठवड्यात नाॅमिनेशनमध्ये मनसवी सोबत समर्थ, ईशा मालवीय, अरुण माशेट्टी, विक्की जैन आणि सना रईस खान हे देखील होते. पण मनसवी बाहेर पडली. या शोमध्ये रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. त्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!