Latest Marathi News
Ganesh J GIF

‘आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे’

अजित पवार गटातील कॅबिनेट मंत्र्यांचे वादग्रस्त विधान, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास पुन्हा विरोध

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.सध्या सरकारने दोन महिन्याचा वेळ मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी आग्रही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. पण आता त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून घ्या, आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र मराठ्यांना आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. ओबीसींकडून याबाबत स्पष्टपणे बोलून देखील दाखवले आहे. पण आता मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, “आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे. पण आपल्यावर अन्याय होत असेल तरी सुद्धा आपण गप्प राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही, त्याला कोणी औषध देणार नाही. त्यामुळे आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे. जर का खरोखरच निजामशाही कुणबी नोंदी सापडली असतील, तर त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास काही हरकत नाही. परंतु, ५, १०, १५ हजारांनंतर आता अख्ख्या महाराष्ट्राला ओबीसीतून आरक्षण द्यायचे तर असे होणार नाही. म्हणजेच समोरच्या दरवाजातून प्रवेश मिळत नाही तर मागच्या दरवाजातून ओबीसीच्यामध्ये येण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. असा दावा त्यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही. पण त्यांना वेगळे आरक्षण द्या. आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही येऊ नका. कारण जवळजवळ ३७५ जाती आहेत आणि ५४ टक्क्यांपेक्षा जास्त लोक गोरबगरिब आहेत. त्यांच्या आरक्षणावर गदा येईल. हे आमचे म्हणणे आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आरक्षाणाचा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.

दरम्यान भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात “आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोच आहे की आता आवाज उठवा. एकतर आपण कुठपर्यंत लढणार. गावागावात त्यांचे बुलडोझर चालतायत. त्यात ओबीसी काही वाचणार नाही आता. त्यामुळे आता करेंगे या मरेंगे. हेच सगळ्यांनी करायला पाहिजे. असंही मरतंय, तसंही मरतंय. दुसरं काय. त्यांचं सगळं झालं. मी उभा राहतोय’, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!