Latest Marathi News
Ganesh J GIF

आज फैसला! १२वीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार; ‘असा’ पाहा तुमचा रिझल्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज (शनिवार, 2 मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.11 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, प्रत्याक्षात निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

12वी परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळावर पाहता येईल. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या 12 वीच्या परीक्षेसाठी यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाउनलोड करता येईल तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ती महत्त्वाची ठरणार आहे.

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट आऊट घेता येईल. ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार, 3 मे ते रविवार दिनांक 17 मेपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्द‌तीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!