
ग्रामीण विकासाला येणार गती: वाघोलीत जिल्हा परिषद सदस्यांसाठी विशेष कार्यशाळा; योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर
सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य पदी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशदा (पुणे) येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी उपस्थित सर्व सदस्यांना “जिल्हा परिषदेकडे नाविन्यपूर्ण योजना व योजनांची अंमलबजावणी” या विषयावर मार्गदर्शन केले.लेक्सिकॉन स्कूल-म्हसोबा मंदिर-केसनंद रोड विकासासाठी 8.17 कोटींच्या वाढीव तरतुदीस स्थायी समितीची मान्यता

पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था व आरोग्यवस्था भक्कम करण्यासाठी, एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी, प्रत्येक गावात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबवले जातात. सर्व नवनिर्वाचित सदस्यांमार्फत या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील हा विश्वास गजानन पाटील यांनी व्यक्त केला.


