Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गटाचे खातेवाटप जाहीर?

महत्वाची खाती मिळवत पवारांची बाजी, शिंदे गटाच्या विरोधानंतरही भाजपाची पवारांना साथ?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर आज मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार आणि सहकारी मंत्री सहभागी झाले आहेत. त्यातच अजित पवार आणि सहभागी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या विनंतीनंतरही पवार गटाला महत्वाची मंत्रीपदे देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात अजित पवारांचा वरचष्मा राहणार असल्याचे दिसत आहे.

शपथविधीनंतर अजित पवार आज पहिल्यांदा मंत्रालयात आले होते. यावेळी इतर मंत्रीही त्यांच्यासोबत होती. अजित पवार यांच्यासोबत ४३ आमदार आणि ३ खासदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण कोणाच्या बाजूला किती आमदार याचा फैसला उद्या होणार आहे. शिंदे गटाने महत्वाची खाती अजित पवार यांच्या गटाला देऊ नका अशी विनंती केली होती. पण ती भाजपाकडुन अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा नाइलाज झाला आहे. एकंदरीत भाजपाला एकनाथ शिंदेपेक्षा अजित पवार यांचे महत्व जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाराज होऊन काय करणार, आता आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागेल ही भरत गोगावले यांची प्रतिक्रिया खुप काही सांगणारी आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवारांच्या गटातल्या मंत्र्यांची आज मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये इतर कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे संभाव्य खातेवाटप

अजित पवार- अर्थ व वित्त
दिलीप वळसे पाटील :- सहकार
धनंजय मुंडे :- सांस्कृतिक विभाग
अदिती तटकरे :- महिला व बालविकास
हसन मुश्रीफ :- वस्त्र उद्योग
छगन भुजबळ :- अन्न व पुरवठा
संजय बनसोडे :- क्रीडा
अनिल पाटील :- पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम :- आदिवासी

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!