उपमुख्यमंत्र्याचा पत्नीचा स्वतःच्या गाण्यावर बेभान होत डान्स
बोल्ड ड्रेसमध्ये केलेल्या डान्सची होतोय चर्चा, गाण्याला अल्पावधीत लाखो व्हयूज
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. यात आता त्या एक गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आता अमृता फडणवीस यांचे एक नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
“आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमृता फडणवीस यांनी या गाण्यात डान्सही केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपसून अमृता फडणवीस यांच्या या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. त्या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्यात दिसणार आहेत. आता हे गाणे प्रदर्शित झाले असून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी अमृता यांचा लूक, डान्स सर्व काही पाहून कौतूकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गाण्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘अज मैं मूड बणा लेया गाणे प्रदर्शित झाले’ असे म्हटले आहे. अमृता फडणवीस या नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आपलं मत थेटपणे मांडण्यासाठी त्यांना बऱ्याचदा ट्रोलही केलं जाते. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही.
अमृता फडणवीस यांचे हे नवे गाणे ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात आले आहे. या गाण्यातील त्यांचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.