Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील आझम कॅम्पबेल परिसरात कोयता गँगाचा पुन्हा राडा

कोयते नाचवत दहशत निर्माण करण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे दि ६ (प्रतिनिधी) – पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारुनही पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील एका कोयता गँगने राडा केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील निशा रेस्टॉरंट बाहेर कोयता गँगने जोरदार राडा केला. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये घुसत कोयता आणि लाठ्याकाठ्याने सामानाची तोडफोड केली. त्याचबरोबर परिसरात कोयते नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न या गुन्हेगारांकडून करण्यात आला आहे. यावेळी निशा रेस्टॉरंटच्या मालकाला धमकी देत हॉटेल बंद करण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयता गँगचा वाढता हैदोस पोलीसांसमोर आव्हान बनले आहे. त्यामुळे पोलीसांनी त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी २८ डिसेंबरला हातात कोयते घेऊन दहशत माजवली होती. तसेच परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांवर कोयता चालवत जखमी केले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील एकाला चांगलाच चोप दिला होता. तर दुस-याची धिंड काढली होती., त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नसल्याचे आजच्या घटनेमुळे समोर आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!