Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न?

ट्विटमुळे बी टाउनमध्ये खळबळ, काही आठवडे होती गंभीर अवस्थेत,नेमके काय घडले?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील अभिनेत्री पूजा हेगडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारण ठरले आहे ते तिच्याविषयी पसरलेली अफवा. त्यामुळे संतापलेल्या अभिनेत्रीने थेट ती अफवा पसरवणा-या व्यक्तीला नोटीस पाठवलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे.

उमेर संधू नावाच्या एका ट्विटर युजरने १५ जुलै रोजी पूजा हेगडे हिच्याविषयी धक्कादायक ट्वीट केले होते. पूजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे ट्वीट त्याने केले होते. “ब्रेकिंग न्यूज: पूजा हेगडेने आज दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेने तिच्या कुटुंबीयांना तिला वाचवले. तपशील येत आहेत. तिच्या भावानुसार, ती मागील २ आठवड्यांपासून गंभीर अवस्थेत होती.” असा दावा त्या ट्विटमध्ये करण्यात आला होता. ही गोष्ट अभिनेत्रीला समजताच तिने संधूला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. संधूने स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. “पाठव पाठव नोटिसा, फ्लॉप अभिनेत्री.” असे ट्विट त्याने केले आहे. आता यावर काय होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान पुजाबद्दल बोलायचे झाल्यास मागील एक वर्ष पूजा हेगडे हिच्यासाठी खास राहिले नाहीये. तिचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले आहेत. तिचा प्रभास याच्यासोबतचा ‘राधे श्याम’ हा पॅन-इंडिया सिनेमा वाईटरीत्या फ्लॉप झाला होता. तसेच, मागील वर्षी आलेला ‘सर्कस’ हा सिनेमाही खास कमाल करू शकला नव्हता. यावर्षी सलमान खानसोबतचा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातही ती दिसली होती. मात्र, सिनेमा कमाल करू शकला नाही.

पूजाचे कुटुंबीय कर्नाटकातील उडपीचे आहेत. तिचा जन्म जरी मंगलोर येथे झाला असला तरी मुंबईतच ती लहानाची मोठी झाली. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईतच झाले. तिने एम कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मोंहजोदारो या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात तगडी स्टारकास्ट होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!