Latest Marathi News
Ganesh J GIF

उसने पैसे परत न केल्याने पतीसमोरच महिलेवर बलात्कार

हडपसरमधील घटनेने पुण्यात खळबळ, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पुणे हादरले?

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे खाजगी सावकाराने पतीसमोर पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधून समोर आली आहे. आरोपी सावकाराने पत्नीवर अत्याचार करताना तिच्या पतीला समोरच बसवून ठेवल्याचे उघड झाली आहे.

इम्तियाज हसीन शेख याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी २०२३ मध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. एका ३४ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पीडित महिलेच्या पतीला आरोपी इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे महिलेचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा आरोपीने व्हिडिओ देखील बनवला होता. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी इम्तियाज हसीन शेख याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. सहा महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान हा प्रकार समजताच पीडितेने तात्काळ हडपसर पोलीस ठाणे गाठले आपली तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पण यामुळे खाजगी सावकारी मुद्दा समोर आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!