Latest Marathi News
Ganesh J GIF

तुमच्याकडे तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचा नंबर आहे का? जाणून घ्या तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचे नंबर

पुणे – दर्शना पवार हत्याकांड आणि पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर कोयताने वार करण्याचा प्रयत्न या दोन्ही घटनेने पुण्यासह महाराष्ट्रभरात चिंतेचे वातावरण आहे. मुलीच्या सुरक्षिततेला घेऊन पोलिस सुद्धा तितकेच सतर्क आहे. दामिनी मार्शल टीमच्या मदतीने मुलींना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात पुणे शहर पोलिसांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये पुणे पोलिसानी एका मुलीचा आणि मार्शल टीमच्या एका महिला पोलिसचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” या फोटोमध्ये एक नोकरी करणारी तरुणी आहे जी लोणावळ्यातून पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली पण एक मुलगा तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. तिच्याकडे शिवाजीनगर येथील दामिनी मार्शलचा नंबर सेव्ह होता. तिने त्वरीत कॉल केला आणि दामिनी मार्शल टीमच्या पोलिसांनी तिला शिवाजीनगर रेल्वेस्टेशनवर संपर्क साधला आणि तिला प्रत्यक्षपणे भेटले.” 

 

पुढे ट्विटमध्ये लिहिले आहे, “तुमच्याकडे तुमच्या परिसरातील दामिनी मार्शलचा नंबर आहे का? पुण्यातील दामिनी मार्शलच्या सर्व नंबर्सचा फोटो शेअर करुन पुणे पोलिसांनी सेव्ह करण्याचे आवाहन केले आहे. @PuneCityPolice या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पुणे शहर पोलिसांनी हे ट्वीट केले आहे. 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!