Latest Marathi News
Ganesh J GIF

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरता का? मग ही बातमी वाचा

१ एप्रिलपासून नियमात होणार बदल, या गोष्टी तपासा नाहीतर व्यवहार होतील बंद

पुणे – आजकाल बरेच व्यवहार आॅनलाईन होत आहेत. अगदी भाजीपाला किंवा छोट्याशा दुकानातही आता युपीआय पेमेंट स्वीकारले जात आहेत. यामुळे कॅशचा वापर मर्यादित होत आहे. पण आता गुगल पे, फोन पे आणि पेटीएम वापराचे नियम बदलले आहेत.

यूपीआय युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून गूगल पे, फोनपे व पेटीएम यांसारख्या अॅप्सद्वारे यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू होत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबतची घोषणा केली आहे. आता १ एप्रिलपासून यूपीआयशी लिंक असलेला मोबाईल नंबर कित्येक महिने बंद असेल, तर ते बँक अकाउंट यूपीआयममधून हटविण्यात येणार आहे, याचा अर्थ तुमचे बँक अकाउंट बंद मोबाईल नंबरशी लिंक असेल, तर ते डिलीट करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला त्या नंबरवरून कोणतेही यूपीआय पेमेंट करता येणार नाही. बंद किंवा अॅक्टिव्ह नसलेल्या मोबाइल नंबर्समुळे बँकिंग आणि यूपीआय सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. त्यात टेलिकॉम ऑपरेटर हे बंद मोबाईल दुसऱ्या ग्राहकाला देतात. ज्यामुळे सायबर गुन्हेगारीचा धोका वाढतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हाला तुमचे व्यवहार सुरु ठेवायचे असतील तर तुम्हाला एक चालू असलेला नंबर बँक खात्याशी संलग्न करावा लागणार आहे. दरम्यान देशातील बहुतांश लोकांनी आता यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करण्यास सुरुवात केलीये. यामुळे आपले जगणे अगदी सोपे झाल आहे, पण त्याचवेळी सायबर क्राईमच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे.

तुमचे बँक खाते जुन्या नंबरशी किंवा आता सक्रिय नसलेल्या नंबरशी जोडलेले असेल, तर तुमचा नंबर बँक खात्याशी अपडेट करा. तसेच, तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याशी संपर्क साधून बंद नंबर सक्रिय केला जाऊ शकतो. एकदा तुमचा नंबर सक्रिय झाला तर तुम्ही पूर्वीप्रमाणे व्यवहार करु शकता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!