Latest Marathi News
Ganesh J GIF

तरुणांना गुन्हेगार न मानता सहानुभूतीने बाहेर काढा; ‘नशामुक्त महाराष्ट्र धोरण’ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यांना या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना गुन्हेगार न मानता सहानुभूतीने या दुष्टचक्रापासून दूर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित ‘नशामुक्त महाराष्ट्र धोरणा’च्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शाळा व महाविद्यालये टपरीमुक्त: सर्व शैक्षणिक संस्थांचे परिसर अमली पदार्थमुक्त आणि टपरीमुक्त असावेत. प्राचार्यांनी आपला कॅम्पस ‘ड्रग-फ्री’ घोषित करावा. तसेच शालेय अभ्यासात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांचा समावेश करावा.

नशामुक्ती केंद्रांचे जाळे: प्रत्येक शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन केली जातील. नशामुक्त झालेले तरुण पुन्हा त्याकडे वळू नयेत यासाठी पुनर्वसनाची साखळी उभारली जाईल.

विशेष जलदगती न्यायालये: एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा निकाल वेगाने लागण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन केली जातील आणि विशेष सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार केले जाईल.

जिल्ह्यांचे रँकिंग: अमली पदार्थविरोधी कारवायांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन करून जिल्ह्यांचे रँकिंग ठरवले जाईल.

अमली पदार्थ जप्तीत मोठी वाढ

बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२५ मध्ये जप्तीच्या कारवाईत २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२५ मध्ये तब्बल १,३४० कोटी रुपये किमतीचे ५६,२०६ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या मालाच्या किमतीनुसार ही वाढ ४९ टक्के आहे.

निवडणूक वेळापत्रकाबाबत महत्त्वाची टीप

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम वेळोवेळी जारी केला जातो. मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या तारखा आणि आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रांची अचूक माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी भारत सरकारच्या अधिकृत Voters’ Services Portal ला भेट द्यावी. तसेच महाराष्ट्रातील स्थानिक अपडेट्ससाठी Chief Electoral Officer, Maharashtra च्या संकेतस्थळाचा वापर करावा.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!