Latest Marathi News
Ganesh J GIF

पक्षाच्या या निर्णयामुळे मा. उपमुख्यमंत्र्यांना कोसळले रडू

कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, पक्षाच्या या निर्णयाचा जोरदार धक्का

हैद्राबाद दि २३(प्रतिनिधी)- निवडणुका ही राजकीय नेतेमंडळींसाठी पर्वणीच असते, कारण आपल्या पक्षाकडून तिकिट मिळवत आमदार खासदार होण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. पण अनेकदा पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अनेक नेते नाराज होतात, किंवा बंडखोरी करतात. पण तेलंगाणात मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे. कारण पक्षाने तिकीट नाकारल्याने एक नेत्याला रडूच कोसळले आहे.

तेलंगणामध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेलंगणामध्ये सध्या के. चंद्रशेखर राव याचे सरकार आहे. ते पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात पक्षाने आपली तयारी सुरु करत पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांनाही धक्का दिला आहे. त्यांनी माजी उपमुख्यमंत्र्यांनाच तिकीट नाकारले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळले. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत. चंद्रशेखर राव यांनी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांनी उपमुख्यमंत्री थातिकोंडा यांना तिकीट नाकारल्यानंतर ते कार्यकर्त्यांसमोरच रडू लागले. थातिकोंडा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘जय राजैया, जय तेलंगणा’ अशी घोषणाबाजी केली.  ते घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पण यावेळी पक्षाने कडियाम श्रीहरी यांना घानपूर येथून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याच पक्षाच्या एका सरपंचाने राजैया यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या आरोपामुळेच राजैया यांची उमेदवारी नाकारल्याचं बोललं जात आहे. पक्षाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान आम्ही ९५ ते १०५ जागा जिंकू असा आमचा अंदाज आहे. केवळ आमदारच नाही तर खासदारांच्या जागाही. आम्हाला लोकसभेच्या १७ जागा जिंकायच्या आहेत. असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर म्हणाले आहेत.

 

तेलंगणात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी आगामी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच बीआरएसने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीआरएसच्या यादीनुसार मुख्यमंत्री गजवेल आणि कामारेड्डी येथून निवडणूक लढवणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!