Just another WordPress site

ठरल तर ! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले

मैदानात शिंदे गटाने मारली बाजी, ठाकरेंच्या अडचणी वाढणार

मुंबई दि १८ (प्रतिनिधी) – दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात वाद चालू असताना शिंदे गटाने बाजी मारली असून बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. आता शिवसेनेची आशा फक्त शिवाजी पार्कवर अवलंबून असणार आहे.पण शिवाजी पार्क गोठवण्याची प्रकिया सरकारकडून सुरु असल्याची चर्चा असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.

GIF Advt

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी ऐतिहासिक शिवतीर्थावर होतो. पण यंदा शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडविले. त्यानंतर आपणच खरी शिवसेना असा दावा केला.आता दोन्ही गटांनी दसरा मेळावा घेण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कची मागणी केली आहे.पण महापालिकेने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण शिंदे गटाने दुसरे मैदान म्हणून बीकेसी अर्ज एमएमआरडीने स्वीकारला आहे. पण त्याच वेळी शिवसेनेचा अर्ज फेटाळला आहे. मुंबई महानगरपालिका कुणाला परवानगी देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पण उद्धव ठाकरे यांनी ‘सालाबादप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा दादरच्या शिवतीर्थावरच होणार आहे. त्याबद्दल कोणताही संभ्रम नको. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेनेच्या सर्व आघाड्यांनी कामाला लागावे,’ असा आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवाजी पार्कवर कोण्या एका गटाला परवानगी दिल्यास मोठा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महापालिका मैदान गोठवू शकते. त्यामुळे शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय असणार आहे. पण शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत.पण सध्यातरी पर्यायी जागांचा विचार करता एकनाथ शिंदेंनी आघाडी मारल्याचं दिसून येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!