Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच या अभिनेत्यासोबत अडकणार विवाहबंधनात?

अभिनेत्रीच्या वाढदिवसा दिवशी विवाहबद्ध होण्याची चर्चा, अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचा यासाठी दबाब, अभिनेत्री मोठा निर्णय घेणार?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीत अनेक नवीन जोड्या बनत असतात किंवा बिघडत असतात. पण फार कमी जोड्या विवाहबंधनात अडकत असतात. पण आता आणखी एक जोडी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लग्न करणार आहेत. याविषयी अद्याप तमन्ना किंवा विजयकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही मात्र लग्नाची तयारी सुरु असल्याची चर्चा मात्र जोरात सुरु आहे.

तमन्ना आणि विजयच्या डेटिंगच्या चर्चा अनेक काळापासून सुरु आहेत. पण त्यांनी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक वेब पोर्टलने तसा दावा केला आहे. तमन्नाच्या कुटुंबियांकडून लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात आहे. तमन्ना भाटियाचे वय ३० पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकत आहेत. तर लग्नासाठी विजयवर देखील कुटुंबीयांकडून दबाव टाकला जात आहे. सध्या तमन्नाने कोणताही प्रोजेक्ट हातात घेतलेला नाही. त्यामुळे ती लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त असल्याचे मत व्यक्त होत आहे. या सगळ्या चर्चांमुळे तमन्ना आणि विजयचे चाहते खूप आनंदात आहेत.तमन्नाने यापूर्वी एका मुलाखतीत लग्नाविषयी मत मांडले होते. दरम्यान याविषयी अद्याप तमन्ना किंवा विजयकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही मात्र लग्नाची तयारी सुरु असल्याची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. तमन्नाच्या वाढदिवशी म्हणजेच २१ डिसेंबरला हे जोडपे आश्चर्यचकितपणे लग्नाची घोषणा करू शकतात, अशीही बातमी आहे. दोघांनी ‘लस्ट स्टोरीज 2’ वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं. या वेब सीरिजच्या निमित्ताने तमन्ना भाटियाने पहिल्यांदाच बोल्ड सीन दिले होते. विजय वर्मासह तिने हा किसिंग सीन दिला होता. याच वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यानच दोघे एकत्र आले होते आणि नात्यात अडकले होते. तत्पूर्वी तमन्नाचे नाव यापुर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाक बरोबर जोडण्यात आले होते.

तमन्ना भाटियाचा जन्म २१ डिसेंबर १९८९ आणि विजय वर्मा यांचा जन्म २९ मार्च १९८६ रोजी झाला. तमन्ना आणि विजय यांनी नुकतेच जूनमध्ये त्यांच्या नात्याची माहिती दिली होती. ते अनेकदा अनेकदा बॉलिवूड पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसत असतात. आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!