या कारणामुळे भर रस्त्यातच महिलांची जोरदार फ्री स्टाईल हाणामारी
सोशल मिडीयावर महिलांची हाणामारी व्हायरल, कारण एैकुन डोक्यावर हात माराल, बघा काय झाल?
बीड दि १९(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अलिकडे महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. खासकरुन लोकलमधील हाणामारी कायमच चर्चेत असते. पण आता सोशल मिडीयावर नातेवाईक असलेल्या महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बीड शहरातील जोशी उद्यान भागात रविवारी सायंकाळी महिलांची फ्री स्टाईल मारामारी पाहायला मिळाली.ही मारामारी पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील महिला एकमेकांच्या नातेवाईक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एक महिला आपल्या पतीसोबत झालेल्या वादामुळे वेगळे राहत होती. त्यामुळे पती सतत तणावात असायचा याच कारणाने त्याचा अपघात झाला. त्यामुळे त्याच्यावर बीडमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याची पत्नी भेटण्यासाठी आली असता तिला सासू आणि ननंद यांनी तिला भेटु दिले नाही. ‘महिन्याभरापासून त्याच्यापासून तू लांब आहेस, त्याच टेन्शनमध्ये त्याचा अपघात झाला. मग आता तू नेमकं काय करायला आलीस तुला बघून तो जास्त चिडत आहे. त्यामुळे पुन्हा त्याच्या डोक्यावर ताण पडत आहे. तू या ठिकाणी थांबायचं नाही.’ असे बजावल्यानंतर पत्नीही वाद घालू लागली. अखेर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सध्या सोशल मिडीयावर या हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
सोशल मिडीयावर ही हाणामारी व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडीयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही नेटकरी याची मजा घेत असुन काही जणांनी दुभंगत असलेल्या नात्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या ही फ्री स्टाईल हाणामारी व्हायरल होत आहे.